न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १० फेब्रुवारी २०२२) :- पदोत्रतीकरिता महासंचालक कार्यालयाने सहाय्यक पोलीस आयुक्त व पोलीस उपअधीक्षक पदावरील निवडसूची जाहीर केली आहे. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील १५ वरिष्ठ पोलीस निरीक्षकांचा या यादीत समावेश आहे. मागील निवडसुचीत नाव असूनही काही कारणास्तव पदोन्नती न मिळालेल्या पोलीस निरीक्षकांचा या यादीत समावेश करण्यात आला आहे.
या पोलीस निरीक्षकांना पदोन्नती देताना संबंधित आयुक्तालय अथवा पोलीस घटक प्रमुखाने विशेष काळजी घेण्याची सक्तताकीद देण्यात आली आहे. अनेक पोलीस घटक प्रमुखांकडून आपल्या हद्दीतील अधिकाऱ्यांची माहिती पाठविताना ती अपूर्ण, उशिराने अथवा पाठवतच नाहीत. त्यामुळे या अधिकाऱ्यांना पदोन्नती देताना गंभीर स्वरूपाच्या अडचणी निर्माण होतात.
त्यामुळे बऱ्याच अधिकाऱ्यांची प्रकरणे खुली ठेवावी लागतात. तसेच या निवडसुचीत पदोन्नती न मिळाल्याने ते अधिकारी महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणापुढे दावे दाखल करतात. त्यामुळे पदोन्नती देण्याकरिता पोलीस महासंचालक कार्यालयाच्या वतीने कालबद्ध कार्यक्रम आखण्यात आला आहे. तसेच सेवा तपशील नमुना कशाप्रकार भरावा, याचीदेखील माहिती देण्यात आली आहे. राज्य पोलीस दलातील ४१५ वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या नावांचा या निवडसुचीत समावेश आहे.












