- पाच तृतीयपंथीयांना पोलिसांकडून अटक…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११ फेब्रुवारी २०२२) :- कुदळवाडी मेन रोडवरील राजा एंटरप्रायजेस या भंगारच्या दुकानात तृतीयपंथीयानी गुरुवारी सकाळी साडेदहा वाजता दुकानमालकाला पैसे मागितले. सुट्टे पैसे नसल्याने फिर्यादीने अभी कुछ भी धंदा नहीं हुआ थोड़ी देरबाद आओ असे सांगितले, त्यावरून आरोपींनी शिवीगाळ केली. दुकानासमोर कपडे काढून नग्न होण्याचा आरोपींनी धाक दाखवला.
मोठमोठ्याने टाळ्या वाजवून सर्वजण दुकानात घुसले, फिर्यादी व त्यांच्या भावाला आरोपी तृतीयपंथीयांनी मारहाण केली. दुकानातील ड्रोवरमधून चार हजार २०० रुपये रोख रक्कम आरोपीनी जबरदस्तीने काढून घेतली. मोहम्मद रज्जाक अब्दुलरोफ चौधरी (वय ३२, रा कुदळवाडी, चिखली) यानी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
ऋतू संजय जगताप (वय २२), अलिशा सभाजी पवार (वय ३३), मन्नत गोरख खवळे (वय २२ रा. टाळगाव चिखली), किरण बाळू वाघ (वय २६, रा. मोहननगर, चिंचवड), अर्चना दत्ता शिंदे (वय २१ रा. चिखली) अशी अटक केलेल्या तृतीयपंथीयांची नावे आहेत. सहाय्यक पोलीस निरीक्षक श्याम मस्के तपास करीत आहेत.
















