न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११ फेब्रुवारी २०२२) :- केशवनगर येथील चोवीस वर्षीय तरुणीने वायरच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. सीएच्या परीक्षेत अपयश येत असल्याने तिने हे पाऊल उचलल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.
ही घटना शुक्रवारी (दि. ११) सकाळी घडली. कुटुंबियांच्या लक्षात आल्यानंतर तातडीने तिला रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.
तरुणी ही सनदी लेखापाल (सीए) होण्यासाठीची परीक्षा देत होती. मात्र, तिला अपयश येत होते. यामुळे ती तणावात असायची. पोलिसांनी तिचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पिंपरीतील येथील यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात पाठवला असून पोलिस अधिक तपास करीत आहेत.
















