न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११ फेब्रुवारी २०२२) :- पीएमपीएमएल बस थांबा कोसळून शुक्रवारी (दि. ११) दोघे प्रवासी जखमी झाले आहेत. पिंपरी येथील चौकात दुपारी साडेचारच्या सुमारास हा अपघात घडला.
इमरान खान (वय २८, रा. दापोडी), इंद्रजित जयस्वाल (वय ३०, रा. रेसकोर्स, पुणे) असे अपघातात जखमी झालेल्या प्रवाशांची नावे आहेत. त्यांना पिंपरीतील संत तुकारामनगर यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
दोघे बसची वाट पाहत बस थांब्याखाली थांबले होते. तर, पीएमपीएमएलच्या बसथांब्यावर चढून दोघे जण जाहिरातीचा बॅनर लावत होते. त्या वेळी हा अपघात घडला.


















