- पोलिसांनी रंगेहाथ पकडले…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११ फेब्रुवारी २०२२) :- पिंपरी पोलीस ठाण्यातील कर्मचारी रमेश दोरताले, स्वप्नील झणकर, प्रशांत जाधव आणि अमन सय्यद हे पिंपरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत होते. मध्यरात्री दीड वाजताच्या सुमारास खराळवाडी, पिंपरी येथील कॅनरा आणि अॅक्सिस बॅकेचे एटीएममध्ये दोघेजण संशयास्पदरित्या आढळून आले.
पोलिसांनी जवळ जाऊन पाहणी केली असता ते दोघेजण पहार आणि पक्कडच्या सहाय्याने एटीएम फोडत असल्याचे दिसून आले. आरोपी चौधर आणि दिघे यांनी एमटीएममधील सीसीटिव्ही देखील फोडले होते. ही घटना शुक्रवारी (दि. ११) मध्यरात्री दीड वाजताच्या सुमारास खराळवाडी, पिंपरी येथे घडली.
पोलीस कर्मचारी स्वप्नील नंदकिशोर झणकर (वय ३३) यांनी शुक्रवारी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. चैतन्य पांडूरंग चौधर (वय २२) आणि भानुदास अण्णा दिघे (वय २३, दोघेही रा. कोयाळीगाव, आळंदीजवळ, ता. खेड, जि. पुणे) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याबाबत अधिक तपास पिंपरी पोलीस करीत आहेत.
















