न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १२ फेब्रुवारी २०२२) :- मोटार वाहन कर न भरलेल्या व मोटार वाहन कायद्यातील विविध गुन्ह्याअंतर्गत जप्त केलेल्या वाहनांचा जाहीर ई-लिलाव १६ फेब्रुवारी २०२२ रोजी सकाळी ११ वाजता होणार असल्याचे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी अतुल आदे यांनी कळविले आहे.
वाहन मालकांना लिलावाच्या तारखेपर्यंत वाहन कर भरण्याची संधी देण्यात आली आहे. लिलाव करण्यात येणारी वाहने वाघेश्वर पाकींग येथील आवारात पाहणी करण्यासाठी उपलब्ध आहेत. ई – लिलावात एकूण ३४ वाहने उपलब्ध आहेत. यात टूरिस्ट टॅक्सी, ट्रक, बस, हलकी परिवहन वाहने, रिक्षा या वाहनांचा समावेश आहे.
ई – लिलावात सहभागी होण्यासाठी ११ ते २४ फेब्रुवारी २०२२ सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत संकेतस्थळावर तसेच प्रादेशिक परिवहन कार्यालयात ५० हजार रूपये रकमेचा आर.टी.ओ. पुणे या नावाने अनामत धनाकर्षसह नाव नोंदणी करून प्रत्यक्ष येऊन पूर्तता करावी. ई – लिलावात जीएसटी धारकांनाच सहभाग होता येणार आहे. सविस्तर माहितीसाठी कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन आदे यांनी केले आहे.