न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १२ फेब्रुवारी २०२२) :- काळेवाडी तापकीरनगर येथील रहिवासी सुनील चतुर्भुज जराड (वय ४१ वर्षे) यांचे शनिवारी (दि. ५ फेब्रुवारी) रोजी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले.
त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली. मनमिळावू स्वभावामुळे ते सर्वाना आवडते होते. त्यांच्या अकाली जाण्याने नातेवाईक व त्यांच्या मित्र परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. परमेश्वर त्यांच्या आत्म्यास शांती लाभू दे. त्यांचा दशक्रिया विधी सोमवारी (दि. १४) रोजी बारामती येथील उंडवडे कडेपठार या गावी होईल.
न्यूज पीसीएमसीचे प्रतिनिधी संतोष जराड यांचे ते लहान बंधू होतं.