- बुधवार वगळता इतर दिवशी ‘कोव्हिशिल्ड’ लस मिळणार…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १४ फेब्रुवारी २०२२) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अ, ब, क, ड, इ, फ, ग, ह या प्रभागनिहाय लसीकरण केंद्रावर उपलब्ध लसीच्या साठयानुसार बुधवार वगळता इतर दिवशी वय १८ वर्षावरील सर्व नागरिकांना ‘कोव्हिशिल्ड’ लसीचा पहिला, दुसरा व प्रिकॉशन डोस देण्यात येत आहे. कोव्हॅक्सिन लसीचा पुरेसा साठा उपलब्ध नसल्याने कोव्हॅक्सिन लसीकरण करण्यात येणार नाही.
कोविन अॅपव्दारे ऑनलाईन स्लॉट बुकिंग पध्दतीने ३० टक्के लाभार्थी आणि ऑन द स्पॉट रजिस्ट्रेशन इन कोविन अॅप पध्दतीने ७० टक्के लाभार्थी अशी लसीची क्षमता आहे. लसीकरण अंतर्गत दुसरा व प्रिकॉशन डोस चा लाभ घेण्यासाठी शासनाने निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार निकष पुर्ण केलेल्या लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यात येईल, असे पालिकेने कळविले आहे.


















