न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १४ फेब्रुवारी २०२२) :- बेकायदेशीर दुचाकी बंद करा या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांसाठी पुणे व पिंपरीतील रिक्षा चालक मालकांनी पुणे आरटीओ कार्यालवर आंदोलन छेडले. सकाळी दहा वाजता पिंपरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून आंदोलनास सुरुवात करण्यात आली.
यावेळी महाराष्ट्र रिक्षा पंचायतचे संस्थापक अध्यक्ष बाबा कांबळे, बाळासाहेब ढवळे, लक्ष्मण शेलार, अनिल शिरसाट, रवींद्र लंके, संजय दौंडकर, धनंजय कुदळे, जाफर शेख, तुषार लोंढे, सुरेश सोनवणे, अविनाश जोगदंड, दीपक कुसळकर,प्रदीप आहिरे, हे उपस्थित होते.
रिक्षा चालकांचे प्रश्न शासन दरबारी प्रलंबित असताना ते सोडविण्याऐवजी त्यात आणखीन भर घालण्याचे काम राज्य व केंद्र सरकार करत आहे. बेकायदेशीर दुचाकी आणून रिक्षा चालकांच्या संकटात आणखीन भर घालण्याचे काम सरकारने केले आहे. तीन चाकाच्या सरकारचे रिक्षा चालकाकांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप बाबा कांबळे यांनी केला. तर केंद्र सरकार ओला, उबेर, भांडवलदार कंपन्यांना पाठीशी घालत असल्याचेही ते म्हणाले.


















