न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १४ फेब्रुवारी २०२२) :-पिंपरी – चिंचवड पोलिसांच्या अंमली विरोधी पथकाने बेकायदेशीररित्या गांजा बाळगल्या प्रकरणी दोघांना भोसरीतून अटक केली आहे. आरोपींकडे गांजा असल्याची माहिती पथकाला मिळाली होती. आरोपींकडे गांजा व गांजा ओढण्याचे साहित्य सापडले.
भोसरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, ईश्वरसिन्हा छत्तरसिंग गोड (वय ३५, रा. धावडेवस्ती, भोसरी), विजय महादेवराव राख (वय २१, रा. खंडोबामाळ, भोसरी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
















