- काळ्या फिती बांधून प्रशासनाचा निषेध…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १४ फेब्रुवारी २०२२) :- पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीतील प्रारूप प्रभाग आराखड्यात फुगेवाडीचा ८५ टक्के भाग हा एका प्रभागाला आणि उर्वरित भाग दुसऱ्या प्रभागाला जोडला आहे. त्यानुसार प्रभाग क्रमांक ४३ व प्रभाग क्रमांक ४४ असे दोन प्रभाग अस्तित्वात आले आहेत.
प्रभाग रचना करताना नदी-नाले-मुख्य रस्ते यानुसार रचना करण्याऐवजी गुगल मॅपचा आधार घेऊन गल्लीबोळातून प्रभाग रचना केली आहे ती चुकीची आहे, असे स्थानिकांचे म्हणणे आहे. प्रभागात कोणती अडचण आली तर कोणाकडे जायचे? प्रश्न उपस्थित होत आहे. कुठल्या तरी एका प्रभागाला संपूर्ण गाव जोडावे अशी ग्रामस्थांची मागणी आहे.
प्रभागातील सर्वपक्षीय नेते, सामाजिक कार्यकर्ते, गणेश मंडळ आणि स्थानिक नागरिकांनी या प्रभाग रचनेविरोधात रविवारी एकत्र येत छत्रपती शिवाजी महाराज स्मारक चौकात काळ्या फिती बांधून निषेध नोंदवला.
















