- आज ११३ कोरोनाबाधित; एकाचा मृत्यू; ४०४ कोरोनामुक्त…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १४ फेब्रुवारी २०२२) :- पिंपरी-चिंचवड शहरात आज सोमवारी (दि. १४) रोजी ११३ जणांना कोरोनाची बाधा झालेली आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या ४०४ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
शहरातील सक्रीय रुग्णांची संख्या ३५७२२७ वर पोहोचली आहे. कोरोनामुक्त रुग्णांची संख्या ३५१०७८ वर पोहोचली आहे. आजपर्यंत शहरातील कोरोनामुळे ४६०९ जणांचा मृत्यू झालेला आहे. पिंपरी चिंचवड हद्दीमधील आज मृत झालेली रुग्णसंख्या ०१ एवढी आहे.