- सदस्यांना मुदतवाढ की नवीन सदस्यांची निवड; शुक्रवारी ठरणार…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५ फेब्रुवारी २०२२) :- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीच्या ८ सदस्यांचा दोन वर्षांचा कार्यकाळ २८ फेब्रुवारीला संपणार आहे. त्यांच्या जागी नवीन सदस्यांची निवड केली जाणार की त्यांनाच पुन्हा मुदतवाढ मिळणार, हे येत्या शुक्रवारी (दि. १८) होणाऱ्या सर्वसाधारण सभेत स्पष्ट होणार आहे.
समितीचे सदस्य शशिकांत कदम, अंबरनाथ कांबळे, संतोष कांबळे, अभिषेक बारणे, सुवर्णा बुर्डे, भीमाबाई फुगे (सर्व भाजप), पौर्णिमा सोनवणे, सुलक्षणा धर (दोघे राष्ट्रवादी) यांचा दोन वर्षांचा सदस्याचा कार्यकाळ २८ फेब्रुवारीला संपत आहे.
पालिकेचा सन २०१७ – २२ या पंचवार्षिकेचा कार्यकाळ १३ मार्च रोजी संपत आहे. नवे आठ सदस्य निवडीचा प्रस्ताव शुक्रवारच्या सर्वसाधारण सभेसमोर आहे. दरम्यान, पंचवार्षिकेतील ही सर्वसाधारण सभा अखेरची ठरणार आहे. २२ फेब्रुवारीला आयुक्त राजेश पाटील हे स्थायी समितीचे अध्यक्ष अॅड. लांडगे यांच्याकडे सन २०२२-२३ वर्षाचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत.