- टोळक्याकडून कोयते हवेत भिरकावून कॉलनीत दहशत…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५ फेब्रुवारी २०२२) :- थेरगावातील तळजाई कॉलनी येथे फिर्यादी हे त्यांच्या घराबाहेर बसले होते. त्यावेळी तीन ते चार दुचाकीवरून आलेल्या टोळक्याने कोयते हवेत भिरकावून कॉलनीत दहशत माजवली. फिर्यादी यांचा मुलगा कोठे राहतो, असे विचारले.
त्यावेळी फिर्यादीने त्यांना काय झाले असे विचारले असता मयूर घोलप याने मी पिंपरी -चिंचवडचा भाई आहे, अतुल कोठे आहे. मी त्याला जिवंत सोडणार नाही असे म्हणत फिर्यादीच्या डोक्यात मारण्यासाठी कोयत्याने वार केला. मात्र, फिर्यादीने वार चुकविला व दरवाजावर बसला. दरम्यान, इतर आरोपींनी लाकडी दांडके व लाथाबुक्क्यांनी फिर्यादी याना मारहाण केली.
फिर्यादी यांच्या कुटुंबीयांना शिवीगाळ करून घरासमोरील कुंड्यांची तोडफोड केली. श्यामसुंदर श्रीनाथ यादव (रा. तुळजाई कॉलनी, लेन क्रमांक तीन, थेरगाव) यांनी फिर्याद दिली आहे. याप्रकरणी वाकड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून पालिस अधिक तपास करीत आहेत. शुभम चौधरी व आदित्य चव्हाण यांना वाकड पोलिसांनी अटक केली असून मयूर घोलप, अजय कांबळे, प्रणव शेवाळे, सोन्या साबळे व त्यांच्या सहा मित्रांवर गुन्हा दाखल आहे.