- पन्नासपेक्षा अधिक मोबाईल व इतर साहित्याची चोरी; गुन्हा दाखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ फेब्रुवारी २०२२) :- रुपीनगरमधील सोनिया हाईटस, शॉप नंबर ९ सक्षम एंटरप्रायजेस नावाचे दुकान सोमवारी (दि. १४) रात्री साडेदहा वाजता कुलूप लावून बंद केले होते. रात्रीच्या वेळी अज्ञात चोरट्यांनी दुकानाचे शटर उचकटून आत प्रवेश केला.
दुकानातून वेगवेगळ्या कंपनीचे व किमतीचे ५२ मोबाईल फोन, दोन टॅब, १० स्मार्ट वॉच, २५ एअरबड्स, ७९ स्मार्ट वॉच एअर बड्स वायरलेस ब्ल्यूटुथ संच, पाच ब्ल्यूटुथ, दोन कॅमेरे, २० पॉवर बँक असा एकूण तीन लाख १४ हजार ६६९ रुपयांचा ऐवज चोरून नेला.
मंगळवारी (दि. १५) सकाळी सहाच्या दरम्यान ही घटना उघडकीस आली. हनुमंत कल्याण ढेरे (वय ३२, रा. रुपीनगर, तळवडे) यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.