न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ फेब्रुवारी २०२२) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अ, ब, क, ड, इ, फ, ग, ह या प्रभागनिहाय लसीकरण केंद्रावर उपलब्ध लसीच्या साठयानुसार बुधवार वगळता इतर दिवशी वय १८ वर्षावरील सर्व नागरिकांना ‘कोव्हिशिल्ड’ लसीचा पहिला, दुसरा व प्रिकॉशन डोस देण्यात येत आहे. कोव्हॅक्सिन लसीचा पुरेसा साठाही उपलब्ध झाला आहे. त्यामुळे ‘कोव्हिशिल्ड’ आणि कोव्हॅक्सिन दोन्हींचे लसीकरण करण्यात येणार आहे.
कोविन अॅपव्दारे ऑनलाईन स्लॉट बुकिंग पध्दतीने ३० टक्के लाभार्थी आणि ऑन द स्पॉट रजिस्ट्रेशन इन कोविन अॅप पध्दतीने ७० टक्के लाभार्थी अशी लसीची क्षमता आहे. लसीकरण अंतर्गत दुसरा व प्रिकॉशन डोस चा लाभ घेण्यासाठी शासनाने निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार निकष पुर्ण केलेल्या लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यात येईल, असे पालिकेने कळविले आहे.