- झाडी आणि त्यावरील पक्षी आगीच्या भक्षस्थानी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ फेब्रुवारी २०२२) :- पिंपळे गुरव परिसरातील मिल्ट्रीच्या मोकळ्या आवारातील गवताला मोठी आग लागली. गवत कोरडे असल्यामुळे गवतासह झाडी आणि त्यावरील पक्षीही आगीच्या भक्षस्थानी सापडली आहेत.
शेजारी असणारा विजेचा ट्रान्स्फॉर्मरही जळाला, त्यामुळे आग मिल्ट्रीगेटबाहेरील नागरी वसाहतीपर्यंत पोहोचली. त्यामुळे वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. स्थानिकांनी अग्निशामक दलास कळविले. मुख्य अग्निशमन केंद्रासह रहाटणी आणि उपकेंद्रातील बंब घटनास्थळी पोहोचले असून आग विझविण्याचे शर्थीचे प्रयत्न होत आहेत.