- शिवसेनामंत्र्यांचे चिंचवडमध्ये युतीवर महत्वाचे विधान…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ फेब्रुवारी २०२२) :- महापालिका निवडणुकीत शिवसेना आणि राष्ट्रवादीची युती होणार असल्याचे सुतोवाच दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी केले आहे. तर शिवसेनेचा महापौर असेल, अशी भूमिका संजय राऊत यांनी काही महिन्यांपूर्वी मांडली होती. त्यानंतर पिंपरी – चिंचवडचा महापौर करण्यात शिवसेनेचे मत महत्त्वाचे असेल, असा विश्वास उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी चिंचवड येथील कार्यक्रमात व्यक्त केला.
चिंचवड येथील आयोजित पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते. महापालिकेची निवडणूक तोंडावर आली असताना आता राजकीय हालचाली आणि घडामोडींना वेग येऊ लागला. काही महिन्यांपूर्वी शिवसेना नेते संजय राऊत यांनी पुढील महापौर शिवसेनेचा असेल, अशी गर्जना केली होती. त्यानंतर महापालिका निवडणुकीत युती करण्यासंदर्भात सकारात्मक चर्चा सुरू आहे.
चिंचवड येथील कार्यक्रमात उदय सामंत म्हणाले ” पिंपरी – चिंचवडचा महापौर करताना खासदार बारणे आणि संपर्क नेते सचिन अहिर यांचे मत विचारात घ्यावेच लागेल. त्यामुळे राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र निवडणूक लढणार की काय? असा सवाल उपस्थित होत आहे.