न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ फेब्रुवारी २०२२) :- काळेवाडी येथील शिवतेज क्रिडा व शिक्षण मंडळ संचलित तापकीर शाळेच्या वतीने संस्थेचे सचिव मल्हारीशेठ तापकीर यांच्या संकल्पनेतून काळेवाडी येथील तापकीर चौक येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती दि. १९ फेबुवारी २०२२ रोजी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत तापकीर व पुणे केमिस्ट्र असोशिएशन चे विवेक तापकीर यांच्या हस्ते शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. ओम साई ग्रुप चे संस्थापक अध्यक्ष सोमनाथ तापकीर हस्ते नारळ फोडून कार्यक्रमास सुरवात करण्यात आली. यावेळी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले. सतीश बोचरे या विद्यार्थ्यांनी पोवाडे सादर करून स्फूर्तीदायी वातावरण तयार केले. प्रज्ञा घाग, श्रावणी धस, भाग्यश्री पठारे, चैतन्या पाठक सार्थक ढेंगळे या विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रेरक इतिहास मांडून उपस्थितांची दाद मिळविली. विद्यार्थ्यांनी शिवाजी पाळणा, जिजाऊ वंदना, शिवस्तुती व बालगीत इत्यादी नृत्य सादर केले. पल्लवी पाचाबोले हिने तलवारबाजी, लाठी फिरवणे सारख्या मर्दानी खेळाचे सादरीकरण करून उपस्थितांची अंगावर शहारे आणले.
काळेवाडी जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष पद्माकर जांभळे, उपाध्यक्ष दशरथ वीर, सुखदेव खेडकर, काटे मामा, विमलसन्सचे प्रमुख निलेश शिंदे, डॉ.आजय जाधव, मनोज शिंदे संजय गांधी निराधार योजनेच्या सदस्या अश्विनी तापकीर, व्यंकटेश्वरा मंडळाचे अध्यक्ष शशिकांत तापकीर, रवींद्र बामगुडे आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आयोजन कै भाऊसाहेब तापकीर प्राथमिक विभागाच्या प्रभारी मुख्याध्यापिका जयश्री पवार व इतर कर्मचारी यांनी केले होते. तर सूत्रसंचालन सोनटक्के मॅडम व बोराटे मॅडम यांनी केले. उपशिक्षिका उल्का जगदाळे यांनी उपस्थितांचे व मान्यवरांचे आभार मानले.
















