न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३ फेब्रुवारी २०२२) :- महाराष्ट्र परिवहन महामंडळाच्या पुणे विभागाचे फिर्यादी हे यंत्र अभियंता आहेत. तसेच आरोपी हा एसटीमध्ये लिपिक होता. त्याला बडतर्फ करण्यात आले आहे. आरोपी हा शनिवार, दि. १९ फेब्रुवारी रोजी सकाळी साडेसहा ते अकरा या कालावधीत एसटीच्या दापोडी येथील विभागीय कार्यशाळेच्या गेटवर आला.
मला विनाकारण बडतर्फ करण्यात आलेले आहे. मी तुमची नावे लिहून तुमच्या नावाने आत्महत्या करील, अशी धमकी आरोपीने दिली. तसेच विभागीय कार्यशाळेच्या मुख्य गेटसमोर रस्त्यावर आडवे झोपून राहिला. आरोपीने फिर्यादी व फिर्यादीसोबतच्या अधिकारी व कर्मचारी यांना शिवीगाळ करून तुमची नोकरी घालवतो, अशी धमकी दिली. विभागीय कार्यशाळेच्या मुख्य गेटसमोर रस्त्यावर आडवे झोपून आरोपीने शासकीय कामात अडथळा निर्माण केला, असे फिर्यादीत नमूद आहे.
अशोक सोपानराव सोट (वय ५६, रा. वाघोली) यांनी याप्रकरणी मंगळवारी (दि. २२) भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. विनोद भोजू राठोड (वय ३०, रा. एसटी काॅलनी, स्वारगेट), असे अटक केलेल्या लिपिकाचे नाव आहे. पोलीस उपनिरीक्षक बालाजी जोनापल्ले तपास करीत आहेत.











