न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३ फेब्रुवारी २०२२) :- घरामध्ये शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा विक्रीसाठी साठवून ठेवला. याबाबत सामाजिक सुरक्षा विभागाला माहिती मिळाली असता पोलिसांनी मंगळवारी सायंकाळी छापा मारून कारवाई केली. सहआरोपीने मुख्य आरोपीला गुटखा विक्रीसाठी पुरवला.
या कारवाईमध्ये पोलिसांनी ९३ हजार ३२० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई मंगळवारी (दि. २२) सायंकाळी पावणे पाच वाजता मोहननगर, चिंचवड येथे करण्यात आली. पोलीस हवालदार नितीन लोटे यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
प्रकाश गमनाराम चौधरी (वय ३४, रा. रामनगर चिंचवड) याला अटक केली आहे. त्याच्यासह काळुराम लाबुराम देवासी (वय ३५, रा. चाकण) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत .











