- महिला कॉंग्रेसचा महापालिकेवर हंडा मोर्चा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २४. फेब्रुवारी २०२२) :- पिंपरी चिंचवड महापालिकेला पाणी पुरवठा करणारे पवना धरण मागील वर्षीच्या पावसाळ्यात शंभर टक्के भरले होते. तरी देखिल अद्यापही शहरातील बहुतांशी भागात विशेषता झोपडपट्टी भागात व चाळ परिसरात कमी दाबाने व अनियमित पाणी पुरवठा होत आहे. पुढील पंधरा दिवसात संपुर्ण शहरात पुर्ण दाबाने व नियमित पाणी पुरवठा मनपाने करावा अन्यथा महानगरपालिका भवनाला हजारो महिलांसह घेराव घालू असा इशारा पिंपरी चिंचवड शहर जिल्हा कॉंग्रेसच्या वतीने देण्यात आला.
गुरुवारी (दि. २४ फेब्रुवारी) शहर महिला कॉंग्रेसच्या वतीने शेकडो महिलांनी मनपा भवनावर धडक हंडा मोर्चा काढला. तत्पुर्वी महात्मा जोतीराव फुले आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन मोर्चा मोरवाडी चौकात आला. तेथे अहिल्याबाई होळकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन मनपा भवनाच्या प्रवेशव्दारासमोर पोलिसांनी मोर्चा अडवला. तेथे मोर्चाचे सभेत रूपांतर झाले.
या मोर्चामध्ये शहराध्यक्ष डॉ. कैलास कदम, महिला अध्यक्षा सायली नढे, माजी नगरसेविका निर्मला कदम, छाया देसले, निर्मला खैरे, वैशाली शिंदे, तुलसी नांगरे, स्वाती शिंदे, भारती घाग, डॉ. सुनिता पुलावळे, रमा भोसले, सुप्रिया मलशेट्टी, रझीया शेख, आशा भोसले, अनिता डोळस, रेखा ओव्हाळ, शिल्पा गायकवाड, दिशा बनसोडे, कल्पना बनसोडे, नंदा तुळसे, अनिता धर्माधिकारी आदींसह शेकडो महिला उपस्थित होत्या. शिष्टमंडळाने आयुक्त राजेश पाटील यांना याबाबत निवेदन दिले.












