- भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २४. फेब्रुवारी २०२२) :- दापोडीतील सिंधू निवाससमोर मंगळवारी (दि. २२) पहाटे साडेपाच वाजता आरोपींनी फिर्यादी यांच्या गळ्याला कोयता लावून शिवीगाळ केली. जबरदस्तीने फिर्यादीच्या खिशातील पैशाचे पाकीट व त्यातील १२०० रुपये, आधारकार्ड काढून घेतले.
फिर्यादी यांना धमकी देऊन त्यांच्या कार आणि रुग्णवाहिकेची तोडफोड करून नुकसान केले. तसेच परिसरात दहशत निर्माण केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. विल्यम अड्र्यूज गजभीव (वय ५२, रा. सिंधू निवास, दापोडी) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
त्यानुसार सुमेध उर्फ गोट्या लहू गायकवाड, ऋषिकेश शिंदे, वाजीद शेख, बंडा चलसुरे, अनिकेत उर्फ बॉक्सी शिरीष पठारे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक दत्ताजीराव मोहिते तपास करीत आहेत.












