न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २५ फेब्रुवारी २०२२) :- शेतात भाजी काढत असलेल्या महिलेच्या डोक्यात दगड मारून गळा आवळून सोनसाखळी चोरीचा प्रयत्न केला. याप्रकरणी अज्ञात महिलेवर गुन्हा दाखल झाला आहे. हा प्रकार पुनावळे येथे घडला.
याप्रकरणी मारहाण झालेल्या महिलेने फिर्याद दिली आहे. गुरुवारी (दि. २४) दुपारी फिर्यादी महिला पुनावळे येथील सर्व्हे क्रमांक ४४ मधील शेतात भाजी काढत होत्या.
त्यावेळी तेथे आलेल्या अज्ञात महिलेने फिर्यादीच्या डोक्यात दगड मारून जखमी केले. त्यांचा गळा आवळून सोनसाखळी ओढून तोडण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी हिजवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून पोलिस अधिक तपास करीत आहेत.












