- एकाचा मृत्यू; दुसरा जखमी; दोघेजण अटकेत…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २५ फेब्रुवारी २०२२) :- मयताची आणि एकाची ओळख होती. मयताच्या ओळखीच्या व्यक्तीने त्यांच्याकडे असलेला टेम्पो बुधवारी (दि. २३) रात्री जाधववाडी येथील तळई गार्डन समोरील रस्त्यावर पार्क केला होता. बुधवारी रात्री दीडच्या सुमारास आरोपी तेथे गेले. टेम्पो लावण्याच्या कारणावरून आरोपींनी दोघांसोबत भांडण काढून शिवीगाळ केली.
लाकडी दांडक्याने मारहाण करून एकाला जखमी केले. तर दुसऱ्याच्या डोक्यात व तोंडावर दगडाने मारून ठार केले. त्यानंतर आरोपी पळून गेले. पंडित किसन गायकवाड (वय ५६), असे खून झालेल्याचे नाव आहे. सुरेश अंबिका पटेल (वय २७, रा. जाधववाडी), असे जखमी झालेल्याचे नाव आहे.
मयत पंडित गायकवाड यांचा मुलगा नवनाथ पंडित गायकवाड (वय २९, रा. जाधववाडी) यांनी याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. सुरेश नवनाथ राऊत (वय २२), दीपक प्रदीप पाचपिंडे (वय २२, दोघेही रा. जाधववाडी), असे अटक केलेल्यांची नावे आहेत. चिखली पोलीस पुढील तपास करीत आहेत.












