- विद्यार्थीनिंच्या परतीसाठी पंतप्रधान कार्यालयाकडे करणार पाठपुरावा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २६ फेब्रुवारी २०२२) :- सांगवी परिसरातील कु. गायत्री विजयकुमार पोरे व कु. आदित्य लक्ष्मण काची युक्रेन येथे वैद्यकीय शिक्षण घेत आहेत. युक्रेन व रशिया या देशाची युध्दजनक परिस्थिती पाहता त्यांच्या घरी महापौर सौ. माई ढोरे यांनी भेट दिली.
मुलांशी व्हिडीओ कॉलद्वारे संर्पक साधला. ते सुखरूप असल्याची माहिती मुलांनी दिली. याबाबत पंतप्रधान कार्यालयाला माहीती देऊन विद्यार्थ्यांना लवकरच भारतात आणण्यासाठी प्रयत्न करणार आहे, असा महापौरांनी कुटुंबियांना दिलासा दिला.