- पालिका आयुक्तांचा आदेश…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २७ फेब्रुवारी २०२२) :- करोनाबाधित रुग्णांची संख्या कमी झाली आहे. तसेच रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांची संख्याही अल्प आहे. त्यामुळे शहरातील निर्बंध आणखी शिथील करण्यात आले असून सोमवारपासून शहरातील शिशू वर्ग (नर्सरी ज्यूनिअर, सिनीअर केजी) देखील सुरू करण्यात आले आहेत. याबाबतचे आदेश महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी शनिवारी (दि. २६) दिले.
सद्यस्थितीमध्ये शहरामध्ये करोनाबाधितांची संख्या स्थिर आहे. तसेच बाधित येणाऱ्या नागरिकांमध्ये सौम्य लक्षणे आहेत. त्यामुळे रुग्णालयामध्ये दाखल होणाऱ्यांचे प्रमाण नगण्य आहे.
परिणामी पालकमंत्री अजित पवार यांनी शहरातील निर्बंध शिथील करण्याबाबत विभागीय कार्यालयात झालेल्या बैठकीत आदेश दिले. त्यानुसार आयुक्त राजेश पाटील यांनी आदेश काढत शहरामध्ये शिशू वर्ग सुरू करण्याबाबत आदेश दिले आहेत.