- अग्निशामक विभागाचे अधिकारी गंभीर जखमी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २७ फेब्रुवारी २०२२) :- कोथरुड येथील चांदनी चौकात चालत्या बसला दुपारी दीड वाजण्याच्या दरम्यान पीएमपी बसला आग लागल्याची घटना घडली. त्या घटनेची माहिती मिळताच अग्निशामक विभागाची टीम काही मिनिटात घटनास्थळी दाखल झाली.
त्यावेळी आगीवर नियंत्रण मिळवत असताना, अग्निशामक विभागाचे अधिकारी गजानन पाथ्रुडकर यांच्या चेहर्याला आणि खांद्याला जखम झाली आहे. त्यानंतर त्यांना तात्काळ जवळील रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. आता त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
गजानन पाथ्रुडकर यांचा आज वाढदिवस होता. या घटनेत ती बस जळून खाक झाली असून शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची शक्यता असल्याचे अग्निशामक विभागाने सांगितले.