न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २७ फेब्रुवारी २०२२) :- घातपाती कृत्य टाळण्यासाठी दिघी पोलिसांकडून दहशतवाद विरोधी पथकाची (एटीएस) नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच नागरिकांच्या तक्रार निवारणासाठी विविध पथके कार्यान्वित केली आहेत.
डुकरांच्या शिकारीसाठी वापरण्यात येणारे सुपारीच्या आकाराचे बॉम्ब दगडावर आपटल्याने त्याचा स्फोट झाला. यात पाच वर्षीय चिमुकलीचा मृत्यू झाला. हे बॉम्ब कुठून आले. याचा शोध पोलिसांकडून सुरू आहे. तसेच दिघी पोलीस ठाण्यांतर्गत संरक्षण विभागाची मोठी हद्द असून हा परिसर राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण आहे. त्यातच शिकारीसाठी वापरण्यात येणाऱ्या बॉम्बचा स्फोट झाल्यानंतर येथील सुरक्षा यंत्रणा सतर्क झाली आहे.
कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी तसेच नागरिकांना तत्काळ मदत उपलब्ध करून देण्यासाठी विविध पथकांची नियुक्ती केली आहे. आपत्कालीन परिस्थितीत किंवा आवश्यकतेनुसार नागरिकांनी संपर्क साधावा, असे आवाहन दिलीप शिंदे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी केले आहे.