- आत्महत्येचे कारण अस्पष्ट…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २७ फेब्रुवारी २०२२) :- वल्लभनगर एसटी आगारात चालक म्हणून कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्याने शनिवारी रात्री साडेआठच्या सुमारास घरात पत्नी, मुलांसोबत जेवण झाल्यानंतर बाथरूममध्ये जाऊन गळफास घेऊन आत्महत्या केली.
बराच वेळ होऊनही वडील बाथरुममधून बाहेर आले नाहीत, म्हणून मुलांनी बाथरूमचा दरवाजा ढकलून पाहिलं असता वडिलांनी गळफास घेतल्याचे आढळले. याबाबत माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. एसटी काॅलनी, सांगवी येथे शनिवारी (दि. २६) रात्री नऊच्या सुमारास ही घटना घडली. संजय बंकट सरवदे (वय ४३), असे आत्महत्या केलेल्या एसटी कर्मचाऱ्याचे नाव आहे.












