न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २७ फेब्रुवारी २०२२) :- पिंपरी चिंचवड महानगर पालिकेच्या कर्मचारी महासंघाच्या कार्यकारिणी सदस्य आणि इतर पदाधिकारीच्या झालेल्या निवडणुकीत स्वर्गीय शंकर अण्णा गावडे पॅनलचे प्रमुख शशिकांत उर्फ बबन झिंजुर्डे यांनी अवघ्या ९ मतांच्या फरकाने निसटता विजय मिळवला. झिंजुर्डे यांना एकूण २५३४ मते मिळाली तर त्यांच्याविरुद्ध उभे राहिलेले अंबर चिंचवडे यांना २५२५ मते मिळाली.
२५ फेब्रुवारी रोजी शुक्रवारी मतदान झाले. यानंतर सायंकाळी सहा वाजता सुरू झालेली मतमोजणी शनिवारी रात्री उशिरापर्यंत सुरू होती. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी रात्री उशिरा जाहीर केलेल्या निकालाप्रमाणे स्वर्गीय शंकर आण्णा गावडे पॅनलचे अध्यक्ष पदासह इतर नऊ पदाधिकारी निवडून आले तर कार्यकारणी सदस्य पदासाठी एकूण पंधरा जागांपैकी दहा उमेदवार निवडून आले. अत्यंत चुरशीच्या झालेल्या या निवडणुकीमध्ये स्वर्गीय शंकर आण्णा गावडे पॅनलचे २५ पैकी १९ उमेदवार निवडून आले.
सविस्तर निकाल खालीलप्रमाणे…
उपाध्यक्षपदासाठी मनोज माछरे यांना २६८२, महादेव धोत्रे यांना २६०८ मते तर तर आपला महासंघ पॅनलच्या उमेदवार सुप्रिया सुरगुडे यांना २६१६ मते मिळाली. सरचिटणीस पदासाठी अभिमान भोसले यांना २६८३, चिटणीस पदासाठी मंगेश कलापुरे यांना २६१५, सहसचिव पदासाठी उमेश बांदल यांना २६६५, कोषापाल पदासाठी नितीन समगिर यांना २६४०, संघटक पदासाठी शुभांगी चव्हाण यांना २७०२, मुख्य संघटक पदासाठी दिगंबर चिंचवडे यांना २६१५ मते मिळाली.












