न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ फेब्रुवारी २०२२) :- पिंपरी – चिंचवड महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी प्रभागनिहाय मतदार याद्या करण्याचे काम कर्मचाऱ्यांनी पूर्ण आहे. राज्य आयोगाच्या निवडणूक संगणक प्रणालीत त्या याद्या समाविष्ट करून सोमवारी (दि. २८) यादीचे काम पूर्ण होणार आहे.
प्रभागरचनेचा प्रारूप आराखडा जाहीर केल्यानंतर प्रभागनिहाय मतदार याद्या तयार करण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाने महापालिकेस दिले होते. त्यासाठी पिंपरी चिंचवड, भोसरी व भोर विधानसभा मतदार संघातील मतदारांच्या याद्या व पुरवणी यादी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून घेण्यात आल्या.
पालिका कर्मचाऱ्यांची नियुक्त करून त्यांना मतदार यादी बनविण्याचे प्रशिक्षण शनिवारी (दि. १२) देण्यात आले. त्यांच्यासाठी प्रत्यक्ष जागेवर जाण्याचा सूचनाही देण्यात आल्या. एका कर्मचाऱ्यांस मतदार यादीचे सहा भागांची जबाबदारी देण्यात आली होती. त्यानुसार कर्मचाऱ्यांनी मतदारांच्या यादीचे भाग प्रभागनिहाय फोडले. त्यांच्या नोंदी निवडणूक आयोगाने दिलेल्या कंट्रोल चार्ट तसेच, एक्सेलमध्ये भरल्या आहेत. ते काम गुरूवारी (दि. २४) पूर्ण झाले आहे. त्या याद्या प्रभागनिहाय अंतिम रूप देण्याचे काम सध्या सुरू आहे. ते सोमवारी (दि.२८) पूर्ण केले जाणार आहे.












