- प्लास्टिक मुक्तीसाठी अनिताताई काटे यांची प्रभागात जनजागृती…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ फेब्रुवारी २०२२) :- सध्या पिंपरी चिंचवड शहर कचराकोंडीने त्रस्त असून यामध्ये सर्वाधिक वाटा प्लास्टिक पिशव्यांचा आहे. प्लास्टिक मुक्तीच्या जनजागृतीसाठी पिंपळे सौदागर येथील सामाजिक कार्यकर्त्या सौ. अनिताताई संदीप काटे आणि उद्योजक संदीप काटे ‘प्लॅस्टिक बॅगला पर्याय कापडी पिशवी’ हा पर्यावरणपूरक उपक्रम प्रभागात राबवीत आहेत. या उपक्रमात नागरिकांनी पुढाकार घ्यावा याकरिता येथील आठवडा बाजारात अनिताताई व संदीप काटे यांनी नागरिकांना कापडी पिशव्यांचे वाटप केले. तसेच प्लॅस्टिक बॅग पर्यावरणाच्या दृष्टीने कशा घातक आहेत, हे समजावून सांगितले.
यावेळी उपक्रमात उद्योजक संदीप काटे आणि पिंपळे सौदागर येथील विविध सोसायटीतील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
कापडी पिशव्यांचे महत्व पटवून देताना अनिताताई म्हणाल्या, ”प्लॉस्टिक पिशव्या या मानवी आरोग्यासाठी घातक आहेत. त्यामुळे भविष्यात मोठ्या अडचणीचा सामना करावा लागु शकतो. शासनाच्या आदेशानुसार प्लॉस्टिक पिशव्यांना बंदी घालण्यात आली आहे; मात्र तरीही नागरिकांमध्ये जनजागृती नसल्याने कळत नकळत वापर होतो. तो पुर्णता थांबविण्यासाठी प्रत्येकाने प्लॉस्टिकमुक्तीबाबत जनजागृती करणे गरजेचे आहे. प्लॉस्टिक पिशव्यांना पर्यायी म्हणुन कागदी व कापडी पिशव्यांचा वापर व्हावा. जेणेकरून प्रदूषणमुक्त वातावरण व लोकांचे आरोग्य उत्तम राहण्यास मदत होईल.
”महापालिकेने शहरात प्लास्टीकविरोधी मोहिम तीव्र केली होती; त्यामुळे प्लास्टीक कॅरिबॅग वापरावर नियंत्रण आले होते. परंतु, कारवाई थंडावल्याने शहरात प्लास्टीक पिशव्यांचा सर्रास वापर होताना दिसत आहे. त्याला आळा घातला पाहिजे.”
– सौ. अनिताताई काटे (सामाजिक कार्यकर्त्या)…
















