राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचा डांगे चौकात निषेध अनं जोडे मारो आंदोलन..!
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०१ मार्च २०२२) :- महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी हिंदवी स्वराज्य संस्थापक हिंदुचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केले. त्याविरोधात कोश्यारी यांचा शहर शिवसेनेच्या वतीने सोमवारी (दि. २८) रोजी डांगे चौकात निषेध करून जोडे मारो आंदोलन करण्यात आले. तत्पूर्वी छत्रपतींच्या अश्वारूढ पुतळ्याचे दर्शन घेण्यात आले.
यावेळी शहरप्रमुख अॅड. सचिन भोसले, बाळासाहेब वाल्हेकर, वैशाली मराठे, शहर संघटीका उर्मिला काळभोर, शहर प्रसिध्दी प्रमुख भाविक देशमुख, युवा उपजिल्हाधिकारी दिपक भोंडवे, बाळासाहेब भोंडवे, विधानसभा प्रमुख अनंत कोऱ्हाळे, राजेश वाबळे, युवा विधानसभा संघटक माऊली जगताप, उपशहर प्रमुख तुषार नवले, हरेश नखाते, राजेंद्र तरस, विधानसभा संघटक संतोष सौदणकर, विधानसभा समन्वयक पार्थ गुरव, गणेश आहेर, डॉ. वैशाली कुलथे, कामिनी मिश्रा, सुदर्शन देसले, दिलीप सावंत, कैलास नेवासकर, शिवसेना आजी माजी पदाधिकारी व महिला आघाडी, युवासेना, शिवसेना अंगिकृत संघटनेचे पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.