- एकाला दहा लाखांचा गंडा; आरोपी अटकेत…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०२ मार्च २०२२) :- पुणे महापालिकेमार्फत विविध विकास कामे केली जातात. त्यापैकी ५ कोटी रुपयांचे बजेट लॉकिंग करून देतो, माझी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पीए मुसळे यांच्याशी ओळख आहे. तुमचे काम होऊन जाईल, असे आरोपी प्रवीण विठ्ठल जगताप आणि त्याच्या एका साथीदाराने फिर्यादी महेश पटवर्धन याला सांगितले.
त्यावर महेश पटवर्धन यांनी विश्वास ठेवला. त्यानंतर पटवर्धन यांनी आरोपीला १० लाख रुपये दिले. पण तो काही काम करत नाही.आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच, त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली.
प्रविण विठ्ठल जगताप रा. वाई सातारा आणि एक अनोळखी अशा दोन आरोपींची नावे आहेत. आरोपी प्रवीण जगताप याला अटक केली असून अधिक तपास सुरू असल्याचे बंडगार्डन पोलिसांनी सांगितलं.