न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०२ मार्च २०२२) :- ‘ क ‘ क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत अतिक्रमणविरोधी पथकाच्या वतीने मोशी, जाधववाडी परिसरात अनधिकृत टपऱ्या, पत्राशेड व बॅनरवर मंगळवारी (दि. १) कारवाई करीत ते जप्त करण्यात आले.
जाधवावाडीतील आपले सरकार चौक ते सीएनजी पेट्रोल पंप आणि मोशीतील आळंदी रस्त्यावरील अनधिकृत टपऱ्या, पत्राशेड तसेच, मोठे जहिरात फलकांवर कारवाई करीत ते जप्त करण्यात आले.
सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे, प्रशासन अधिकारी नाना मोरे यांच्या नियंत्रणाखाली अतिक्रमण निरीक्षक संतोष शिरसाठ, ज्ञानेश्वर केळकर, बीट निरीक्षक प्रसाद आल्हाट, योगेश शेवलकर आणि अतिक्रमण पथक व पोलिसांच्या मदतीने ही कारवाई केली.













