न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०२ मार्च २०२२) :- चौघांचा शौचालयाच्या टाकीत बुडून मृत्यू झाला आहे. ग्रामपंचायत कर्मचारी शौचालयाचा टँक साफ करण्यासाठी गेले होते. त्यावेळी ही दुर्घटना घडली. सिकंदर पोपट कसबे, पद्माकर मारुती वाघमारे, कृष्णा दत्ता जाधव, रुपेश कांबळे अशी मृत्यू झालेल्यांची नावं आहेत.
या घटनेची माहिती मिळाल्यानं पोलिसांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेतली. टाकीमध्ये पडलेल्यांना वाचवण्याचे प्रयत्न सुरु होते. अखेरीस चौघांचा या घटनेत मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. हवेली तालुक्यातील कदमवाकवस्ती प्यासा हॉटेलच्या मागच्या बाजूला ग्रामपंचायत हद्दीत ही घटना घडली आहे. जय मल्हार कृपा असं इमारतीचं नाव आहे. या बिल्डिंगच्या शौचालयाची टाकी उपसण्याचं काम सुरु करतेवेळी ही दुर्घटना घडली.
इमारतीच्या शौचालयाची टाकी साफ व पाईप टाकताना एका व्यक्तीचा तोल गेला आणि ती व्यक्ती टाकीत पडली. दरम्यान, या व्यक्तीला वाचवण्यासाठी गेलेली तिघेही यात मृत्युमुखी पडले.












