- आखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेने पालिका लुटली…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०२ मार्च २०२२) :- पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या नागरवस्ती विभागाच्यावतीने शहारातील महिलांना रोजगारासाठी प्रशिक्षण देण्यात येते. यासाठी आखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेची नियुक्ती केली आहे.
या संस्थेने सत्ताधारी भाजप व आधिका-यांच्या संगनमताने महिलांच्या खोट्या सहया करून कोटयावधी रूपये कमवले आहेत. महिलांच्या कागदपत्रांचा गैरवापर करत या संस्थेने खोटया सहया करून महिलांना प्रशिक्षण दिल्याचे दाखविले आहेत. फॉरेन्सिक अहवालामधुन या संस्थेने केलेल्या भ्रष्टाचाराची पोलखोल झाली आहे.
नागरवस्ती विभागाच्या वतीने महिलांना प्रशिक्षण देण्यासाठी आखिल भारतीय संस्थेची नेमणुक केलेली आहे. या संस्थेने महिलांना प्रशिक्षण न देता कोटयावधी रूपयांचे बील महापालिकेकडून वसूल केले.असे आरोप भाजपा नगरसेविका माया बारणे यांनी पत्रकार परिषदेत केले आहेत.पाहुयात काय म्हणाल्यात माया बारणे.












