न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०२ मार्च २०२२) :- थेरगाव येथे मोटारीतून बेकायदा गुटखा घेऊन जात असल्याची माहिती पिंपरी – चिंचवड पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा पथकाला मिळाली. त्यानुसार मंगळवारी (दि. १) थेरगाव येथील चर्चसमोर सापळा रचून एकाला मोटारीसह ताब्यात घेण्यात आले.
आरोपीकडे एक लाख २५ हजार ८१० रुपयाचा गुटखा व तीन हजार ६९० रुपयांची रोकड सापडली. एकाने दुसऱ्याला माल पुरविल्याचे तपासात उघड झाले. वाकड़ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.
हरीराम रत्नाराम विष्णोई (वय ३५, रा. सुखसागरनगर, कोंढवा, मूळ राजस्थान), असे अटक केलेल्याचे नाव आहे. तर सागर याच्यावर गुन्हा दाखल आहे. पोलिस अधिक तपास करीत आहेत.












