- सर्वच ४६ प्रभागातुन मागविले इच्छुकांचे अर्ज…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०३ मार्च २०२२) :- पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने ४६ प्रभागातुन इच्छुक उमेदवारांचे अर्ज मागविले आहेत. राष्ट्रवादीचे नवनिर्वाचित शहराध्यक्ष गव्हाणे यांनी इच्छुकांना अर्ज करण्याचे आवाहन केले आहे.
सोमवार ते शनिवार (दि. १२) सकाळी दहा ते सायंकाळी चारवाजेपर्यंत खराळवाडी येथील पक्ष कार्यालयात इच्छुकांनी कार्य अहवालासह अर्ज जमा करावयाचे आवाहन शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी केले आहे.


















