- मोहननगर येथील रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचे काम निकृष्ट दर्जाचे…
न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ४ मार्च २०२२) :- मोहननगर प्रवेशद्वार ते मेहता हॉस्पिटल दरम्यानच्या काँक्रिटीकरण काम निकृष्ट दर्जाचे झाले आहे. महापालिकेने रस्त्याच्या दर्जाची तांत्रिक तपासणी केली. त्यात कामात ठेकेदाराने हलगर्जीपणा केल्याचे उघड झाले. अखेरीस ठेकेदाराला ८ लाख ३ हजार ५६७ रुपयांचा दंड केला आहे. याबाबत माजी नगरसेवक मारुती भापकर तक्रार केली होती.
महापालिकेच्या वतीने येथील छत्रपती शिवाजी महाराज स्वागत कमान ते मेहता हॉस्पिटल दरम्यान विकास आराखड्यातील १ कि. मी. रस्त्याचे काँक्रिटीकरणाचे काम सुरू आहे. त्यासाठी १४ कोटी ८५ लाख ८४ हजार रुपयांचे कंत्राट इंगवले पाटील कन्स्ट्रक्शन कंपनीला दिले. या कामाची मुदत २४ महिने म्हणजे १६ जुलै २०२१ रोजी संपली. मुदत संपूनही अजूनही रस्त्याचे काम सुरू आहे. याबाबत वारंवार तक्रार करूनही त्यावर ठोस कारवाई झाली नाही. सिमेंट काँक्रीटच्या कामातील अनियमितता दर्जाबाबत ९ मुद्यांची लेखी तक्रार भापकर यांनी आयुक्त राजेश पाटील यांच्याकडे केली. त्याची दखल घेऊन आयुक्तांनी दक्षता व नियंत्रण कक्षाकडे तक्रारीची खातरजमा करण्यास सांगितले.
भापकर म्हणाले, ” दक्षता व नियंत्रण कक्ष अधिकारी, कार्यकारी अभियंता प्रकल्प सल्लागार, ठेकेदार प्रतिनिधी आणि गुणवत्ता नियंत्रण प्रतिनिधी यांनी प्रत्यक्ष स्थळ पाहणी केली. आयुक्तांच्या आदेशानुसार १३ डिसेंबर २१ रोजी पुन्हा स्थळ पाहणी केली. त्यानुसार कार्यकारी अभियंत्यांनी ८ लाख ३ हजार ५६७ रुपये ठेकेदार याच्या बिलातून वसूल करण्याचे आदेश दिले. यामध्ये पीक्यूसी २०० एमएम मिळून आली.
महापालिकेच्यावतीने मोहननगर येथील छत्रपती शिवाजी महाराज स्वागत कमान मेहता हॉस्पिटलदरम्यान विकास आराखड्यातील १ कि. मी. रस्त्याचे काँक्रिटीकरणाचे काम सुरू आहे. त्यासाठी १४ कोटी ८५ लाख ८४ हजार रुपयांचे कंत्राट इंगवले पाटील कन्स्ट्रक्शन कंपनीला दिले. या कामाची मुदत २४ महिने म्हणजे १६ जुलै २०२१ रोजी संपली. मुदत संपूनही अजूनही रस्त्याचे काम सुरू आहे. याबाबत वारंवार तक्रार केल्या. कामाची मुदत १६ जुलैला संपली.


















