न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०३ मार्च २०२२) :- मित्रांसह फिरण्यासाठी कासारसाई धरण परिसरात काही तरुण आले होते. धरणच्या पाण्याशेजारी उभे होते. त्यातील तीन जण पाय घसरुन पाण्यात पडले. त्यातील एकाला मित्रांनी बाहेर काढले, मात्र पाणी खोल असल्याने दोघेजण बुडाले.
त्यांना स्थानिक तरुणांनी पाण्याबाहेर काढले असता त्या दोघांचाही मृत्यू झाला. शशांक सिन्हा (वय १९), रविकुमार विनोदकुमार (१९) अशी बुडून मृत्युमुखी पडलेल्या विद्यार्थ्यांची नावे आहेत.
ते आकुर्डी येथील डी.वाय. पाटील आभियांत्रिकी महाविद्यालयात दुसऱ्या वर्षात ते दोघेही शिकत होते. गुरुवारी (दि. ३) सकाळी दहाच्या दरम्यान ही घटना घडली. प्रकरणी शिरगाव परदंवडी पोलीस तपास करीत आहेत.


















