- कमानी, वायफाय युनिपोलची होणार निर्मिती; स्मार्ट सिटीच्या बैठकीत निर्णय…
न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ४ मार्च २०२२) :- पिंपरी – चिंचवड स्मार्ट सिटी लिमिटेडच्या वतीने पी.पी.पी. तत्त्वावर शहरातील विविध २६ ठिकाणी १०८ सार्वजनिक शौचालये उभारण्यात येणार आहेत. दोन कोटी २८ लाख खर्च करून ९० गॅन्ट्री (कमानी) २४२ वायफाय युनिपोल उभारले जाणार आहेत.
स्मार्ट सिटीच्या संचालक मंडळाची सभा महापौर उषा ढोरे यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी (दि. ३) चिंचवडच्या ऑटो क्लस्टर येथे झाली. या वेळी सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके, विरोधी पक्षनेते राजू मिसाळ, मनसेचे गटनेते सचिन चिखले, संचालक प्रमोद कुटे, विभागीय आयुक्त सौरभ राव, पोलिस आयुक्त कृष्णा प्रकाश, आयुक्त तथा मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश पाटील, नीळकंठ पोमण आणि अधिकारी उपस्थित होते.
समेत विविध योजना व विषयांवर चर्चा करून त्यांना मंजुरी देण्यात आली. शहरातील १६ ठिकाणी २ सीटर टॉयलेट, ६ ठिकाणी ८ सीटर टॉयलेट, ३ ठिकाणी ४ सीटर टॉयलेट आणि १ ठिकाणी १२ सीटर टॉयलेट बांधण्यात येणार आहे. प्रीफेब्रिकेटेड टॉयलेट उभारून ते १५ वर्षे त्यांची ‘मेडिनिला हेल्थकेअरने सेक्युरी व्हेंचसंख्या कन्सोर्टियम’ ही ठेकेदार एजन्सी देखभाल, दुरुस्ती व स्वच्छता करणार आहे. जाहिरातीच्या माध्यमातून एजन्सीला उत्पन्न मिळविता येणार आहे.
प्रिमियममध्ये दरवर्षी ५ टक्के वाढ केली जाणार आहे. शहरात ९० गॅन्ट्री व २४२ युनिपोल उभारण्याचा खर्च २ कोटी २७ लाख ५६ हजार आहेत. ते काम व्हीएसजी इन्फ्राला देण्यास मंडळाने मंजुरी दिली. पूर्ण झालेल्या कामांच्या देखभाल व दुरुस्ती खर्चासाठी स्वतंत्र बँक खाते उघडण्यात येणार आहे. आयसीटी लेडमधील फायबर केबल, सिटी सर्व्हलन्स, ट्रॉफीक, कमांड अॅण्ड कंट्रोल, पाणीपुरवठा, घनकचरा व्यवस्थापन, किऑक्स, पार्किंग आदी कामांसाठी ई ॲण्ड बाथ या सल्लागार एजन्सीला एक वर्ष मनुष्यबळ पुरविण्यास मंजुरी देण्यात आली. सिटी इनोव्हेशन एक्सचेंज प्लॅटफॉर्मसाठी एक कोटीपर्यंतच्या खरेदीसाठी स्वतंत्र समिती स्थापन केली आहे. त्यात मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसह स्वतंत्र संचालक व तंज्ञानाच समावेश होत आहे. इलेक्ट्रीकल इन्फास्ट्रक्चरचे काम एम. बी. इलेक्ट्रीक अॅण्ड कंपनीस दिले आहे. नामांकन व मानधन धोरणास मंजुरी देण्यात आली.
स्मार्ट सिटीचा सन २०२२-२३ या वर्षाच्या एकूण ४२९ कोटी २७ लाख हजार ९२४ एकमेच्या अर्थसंकल्पास संचालक मंडळाच्या सभेत मंजुरी देण्यात आली. सन २०२१-२२ च्या सुधारित अर्थसंकल्पात एरिया बेस डेव्हल्पमेंट (एवीडी) साठी ११० कोटी १४ लाखांची आणि सन २०२२-२३ च्या मूळ अर्थसंकल्पात ४० कोटी १८ लाखांची तरतूद करण्यात आली आहे. सन २०२१-२२ च्या सुधारित अर्थसंकल्पात पॅन सिटी प्रकल्पासाठी २२१ कोटी आणि सन २०२२-२३ च्या मूळ अर्थसंकल्पात २१३ कोटी ५१ लाखांची तरतूद करण्यात आली आहे. पॅन सिटीतील विविध कामांसाठी २१३ कोटी ५१ लाख खर्च अपेक्षित आहे.


















