न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ४ मार्च २०२२) :- भोसरी एमआयडीसीतील जे ब्लॉक येथील नवाकार कंपनीसमोरील रस्त्यावर उभ्या असलेल्या जीपमध्ये तरुणाचा मृतदेह आढळून आला आहे. कशाच्या तरी सहाय्याने गळा आवळून त्याचा खून करण्यात आला आहे.
राकेश रघुनाथ भिलारे (वय ३२) असे त्याचे नाव आहे. हा खून का केला, कोणत्या कारणासाठी केला. हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलिस अधिक तपास करीत आहेत.
















