न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ४ मार्च २०२२) :- भारतीय जनता पक्षाच्या थेरगाव येथील नगरसेविका माया बारणे यांनी महापालिका आयुक्त राजेश पाटील यांच्याकडे शुक्रवारी पदाचा राजीनामा दिला.
त्यांचे पती संतोष बारणे यांनी सहा महिन्यांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे बारणे याही राष्ट्रवादीत प्रवेश करतील, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
२०१२ ते २०१७ या कालावधीत त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे महापालिकेत प्रतिनिधित्व केले आहे. २०१७ च्या निवडणुकीपूर्वी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता.


















