न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ४ फेब्रु.) :- पिंपरी चिंचवड शहरात मोठ्या प्रमाणात पाणी टंचाई चालू आहे, त्यावर उपाय म्हणून महापालिकेने नागरिकांना पिण्यासाठी विहिरींच्या पाण्याचा वापर करावा, याकरीता महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागास स्वी. नगरसेवक दिनेश यादव यांनी नुकतेच मागणीचे पत्र दिले होते.
या पत्रास महापालिकेच्या पाणीपुरवठा व जलनि:सारण विभागाने उत्तर दिले असून, त्यात म्हटले आहे की, पिंपरी चिंचवड महापालिका शहरातील नागरिकांसाठी कोणत्याही विहिरीचे पाणी पिण्यासाठी वापरत नाही.
तसेच शहरातील बहुतांश विहिरी या खाजगी मालकीच्या असून, त्या प्रदूषित आहेत. शहरात पाण्याचे दुर्भिक्ष जाणवल्यास, ज्या विहिरीचे पाणी पिण्यायोग्य असेल, त्या विहिरी जिल्हाधिकारी यांचेमार्फत अधिग्रहित करण्याची तरदूत असल्याचे या पत्रात म्हटले आहे.















