न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ४ फेब्रु.) :- अशोक बँकेचा १९ वा वर्धापनदिन व अशोक सर्वांगीण विकास सोसायटीचा २३ वा वर्धापनदिन बँकेच्या प्रांगणात रविवार (दि. ३) रोजी उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमास ॲड. डॉ. सुरेश माने संस्थापक /अध्यक्ष – बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात माने साहेबांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आली. तसेच त्यांचे हस्ते अशोक दिनदर्शिकेचे प्रकाशनही करण्यात आले. बँकेचे संस्थापक डॉ अशोक शिलवंत यांचे हस्ते माने यांचा महात्मा फुले पगडी, उपरणे, सम्राट अशोक मानदंड व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. माने यांनी मनोगत प्रसंगी बँकेला व डॉ अशोक शिलवंत, अध्यक्ष ॲड. राजरत्न शिलवंत व सर्व संचालक व कर्मचारी वर्गाला शुभेच्छा दिल्या.
यावेळी आचार्य रतनलाल सोनाग्र, एम.बी .चेनीगुंड, मायला खत्री, संदीप धेबडे, सुनिल लिंगाळे, मोहम्मदभाई पानसरे, तुकाराम महाडिक मुंबई, विकास गायकवाड गोरेगाव, बी. डी. गायकवाड बारामती, चंद्रकांत जगताप, विजय गायकवाड अध्यक्ष पंचशील संघ बुद्ध विहार, संत तुकाराम नगर, सतीश गायकवाड, सादिकभाई खान, गणेश शिरसागर, अशोक सरतापे, फुलचंद जोगदंड, भोसले सर, अर्जुन मोरे, माधव अडसुळे, कुलकर्णी मामा, हरेश बोधानी, रविन्द्र इंगवले, अनिल भांगडिया आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रम प्रसंगी ठेवीदार म्हणून एकनाथ जगताप, सोनाजी मोरे, श्रीनिवास सत्तेलू, पांडुरंग शेलार, कारभारी टिळेकर, एस. टी. कोंबाडे तसेच नियमित कर्जफेड करणारे दिपक कोतकर, जावेद शेख, कुलदीप कांबळे, निलेश गुरव आदींचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमप्रसंगी आचार्य रतनलाल सोनाग्रा, बी डी गायकवाड आदींनी शुभेच्छा दिल्या.
प्रास्ताविक प्रसंगी डॉ. अशोक शिलवंत यांनी सर्व सभासद ठेवीदार ,कर्जदार हितचिंतक यांनी गेल्या १९ वर्षांपासून जो विश्वास दाखविला आहे. त्याबद्दल सर्वांचे आभार व्यक्त केले. कार्यक्रम प्रसंगी बँकेचे उपाध्यक्ष प्रकाश बालवडकर, संचालक प्रकाश डोळस, विकास शिलवंत, ॲड. निलेश नगराळे, कल्पना शिलवंत, शिलरत्न शिलवंत, भिमराव माने, रमेश राजांनी आदि उपस्थित होते. तसेच मोठ्या संखेने सभासद ठेवीदार, कर्जदार, हितचिंतक उपस्थित होते. आभार प्रसंगी बँकेचे अध्यक्ष ॲड. राजरत्न शिलवंत यांनी आलेल्या सर्व पाहुणे, सभासद ठेवीदार, कर्जदार, हितचिंतक यांचे आभार व्यक्त केले व १९ व्या
वर्धापनदिनानिमित्त वर्धापन ठेव योजनेची माहिती दिली. सदर योजना ही २५ महिने करिता असून ११% व्याजदर ठेवण्यात आलेला आहे व योजनेचा कालावधी ०३/०२/२०१९ ते ३१/०३/२०१९ पर्यंत ठेवण्यात आलेला आहे
कार्याक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. दिलीप कांबळे यांनी केले व अल्पोहाराने कार्यक्रमाची सांगता झाली.











