न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ४ मार्च २०२२) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने शहरातील अनेक प्रकल्पांचे उदघाटने रविवार दि ६ मार्च रोजी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यात पूर्णांनगर येथील भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी उद्यानाचे उदघाटन व लोकार्पण सोहळा सांयकाळी करण्यात येणार आहे.
भाजपतर्फे शहरात अनेक अर्धवट व निकृष्ट दर्जाचे प्रकल्प उभारले आहेत. त्यापैकीच पूर्णानगर येथील बनविण्यात आलेले भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी उद्यान निकृष्ट दर्जाचे असून अर्धवट कामे झालेली आहेत.
त्यामुळे रविवारी उद्यानाचे उदघाटन झाले तरी नागरिकांना वापरण्यास देऊ शकणार नाहीत. त्यामुळे पूर्णांनगर येथील अर्धवट व निकृष्ट दर्जाचे भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी उद्यानाचे उदघाटन थांबवावे व नागरिकांची दिशाभूल करू नये असे आवाहन माजी महापौर मंगला कदम यांनी केले आहे.
















