- उल्लेखनीय क्षेत्रातील महिलांचा ”उन्नती महिला रत्न” पुरस्काराने होणार सन्मान..
- उन्नती सोशल फाउंडेशनच्या अध्यक्षा कुंदाताई भिसे यांचा पुढाकार…
न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ४ मार्च २०२२) :- जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत उन्नती सोशल फाउंडेशनच्या अध्यक्षा कुंदाताई भिसे यांच्या वतीने पिंपळे सौदागर परिसरात शनिवारी (दि. ५) रोजी दिवंगत लतादीदींच्या आठवणीना उजाळा देण्यासाठी त्यांनी गायलेल्या अजरामर गीतांनी त्यांना श्रद्धांजली अर्पित करण्यात येणार आहे.
विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या महिलांचा ”उन्नती महिला रत्न” पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येणार आहे. राजमाता जिजाऊ उद्यान येथे सायंकाळी ६ ते ८ यावेळेत हा कार्यक्रम होणार आहे.
कार्यक्रमास महापौर उषा उर्फ माई ढोरे, सामाजिक कार्यकर्त्या अश्विनीताई लक्ष्मण जगताप, सामाजिक कार्यकर्ते संजय भिसे व विविध मान्यवरांची उपस्थिती असणार आहे.
कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण ”माझी तुझी रेशीम गाठ फेम प्रार्थना बहेरे”, सारेगमप फेम अजित विसपुते, प्रसिद्ध पार्श्वगायिका राधिका अत्रे, कथक नृत्यांगना प्रिया बिरारी, तर संकल्पना निवेदक शोभा कुलकर्णी हे आहेत. महिलांसाठी खास लकी ड्रॉ पद्धतीने आकर्षक ११ विविध रंगांच्या पैठणी साड्यांचे वाटप करण्यात येणार आहे. याशिवाय विविध वयोगटातील मुलांसाठी डान्स स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. उपस्थित प्रत्येक महिलेस आकर्षक भेटवस्तू देण्यात येणार आहे. या कार्यक्रमास परिसरातील महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवावी, असे आवाहन कुंदाताई यांनी केले आहे.
















