न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ५ मार्च २०२२) :- नगरसेवक रवि लांडगे यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या हातात भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वपदाचा राजीनामा दिला आहे. २०१७ च्या महापालिका निवडणुकीत ते बिनविरोध निवड आले होते.
मी पक्षात राहूनही अनेकदा आमदार महेश लांडगे यांच्या माध्यमातून होणाऱ्या भ्रष्टाचाराला कडाडून विरोध केलेला आहे. भ्रष्टाचार करण्याच्या उद्देशाने भोसरी रुग्णालयाचे खासगीकरण करण्याचा डाव हाणून पाडण्यासाठी मला पक्षाच्या निर्णयाविरोधातच रस्त्यावरची लढाई लढावी लागली.
भोसरी विधानसभा मतदारसंघात विकासकामांमध्ये भ्रष्टाचार बोकाळला आहे. पक्षात माझा राजकीय श्वास गुदमरतो अशी खंत व्यक्त करत रवि लांडगे यांनी भाजपच्या प्राथमिक सदस्य पदाचा राजीनामा दिला आहे.












